मुंबई

शिवजयंती मिरवणुकीत भारतीय संस्कृतीचा देखावा

CD

शिवजयंती मिरवणुकीत ‘स्त्री सन्माना’चा जागर
ठाकरे गटाच्या रामबाग शाखेचा उपक्रम

डोंबिवली, ता. ५ : कल्याणमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आयोजित तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती दरवर्षी नवनवीन सामाजिक संदेशांमुळे चर्चेत असते. यंदा ६ मार्च रोजी सायंकाळी कल्याण पश्चिमेत निघणाऱ्या भव्य मिरवणुकीत ‘एपस्टीन फाइल्स’ या जागतिक गाजलेल्या प्रकरणावर आधारित प्रबोधनात्मक देखावा सादर केला जाणार आहे. शिवसेनेचे उपनेते विजय साळवी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा देखावा यंदा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

रामबाग शाखेच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या या देखाव्यातून एका बाजूला अमेरिकेतील खळबळजनक ‘एपस्टीन फाइल्स’मधील दोषींची निष्पक्ष चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असा संदेश देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या बाजूला, याच विकृतीला छेद देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला ‘परस्त्रीला मातेसमान मानण्याचा’ संस्कार अधोरेखित केला जाणार आहे. या देखाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा मातेसमान सन्मान करून जो आदर्श जगासमोर ठेवला, ती ऐतिहासिक घटना जिवंत केली जाणार आहे.

आजच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर असताना, महाराजांचे हे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला महिलांच्या सन्मानाची शिकवण दिली. आजच्या आधुनिक जगात ‘एपस्टीन फाइल्स’सारखी प्रकरणे समोर येत असताना, शिवरायांचे विचार अधिक प्रस्तुत ठरतात. हाच संदेश आम्ही या देखाव्यातून देत आहोत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी दिली.

सामाजिक संदेश
रामबाग शाखा दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीमध्ये केवळ मनोरंजन न करता सामाजिक प्रबोधनावर भर देते. यापूर्वीही अनेक ज्वलंत विषयांवर त्यांनी देखावे सादर केले आहेत. यंदाचा हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरील असल्यामुळे तो मिरवणुकीत चर्चेचा विषय ठरणार, हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT