मुंबई

दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठात प्रवेश नाकारला

CD

दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठात प्रवेश नाकारला
आंदोलनकारी भंतेना भेटण्यासाठी आले असता सुरक्षा यंत्रणांनी रोखले

धारावी, ता. ५ (बातमीदार) : दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. ५) घडली. संशोधक विद्यार्थी व बौद्ध भिक्खू भदंत विमांसा यांच्या सुरू असलेल्या शांततामय सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी ते विद्यापीठात आले होते. मात्र, विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा यंत्रणेकडून त्यांना रोखण्यात आले. या प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भदंत विमांसा हे मागील १९० दिवसांपासून पाली भाषा विभागाच्या जतन व संवर्धनासाठी, स्वतंत्र पाली भाषा भवन उभारणीसाठी, विभागाला अनुदान देण्यासाठी तसेच कॉ. अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वसतिगृहाच्या नूतनीकरणासह ३०० विद्यार्थ्यांसाठी नव्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी शांततामय पद्धतीने सत्याग्रह करत आहेत. मात्र, त्यांच्या आंदोलनाची दखल न घेता विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा पीएच.डी. प्रवेश रद्द केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांना अमानवी वागणूक दिली जात असल्याची माहिती ही समोर आली आहे. मागील महिनाभरापासून त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली असून, स्वच्छतागृह व स्नानाची सुविधा नाकारण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. आनंद पटवर्धन यांनी सत्याग्रहस्थळी भेट देऊन नैतिक समर्थन व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी प्रवेशद्वाराजवळच भदंत विमांसा यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली व त्यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविला. या वेळी सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संपूर्ण घडामोडींचे चित्रीकरण करत होते.

या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि शांततामय सत्याग्रहाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची प्रतिक्रिया संदेश गायकवाड यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त दिग्दर्शकाला विद्यापीठ परिसरात प्रवेश न देणे ही दुर्दैवी व निषेधार्ह बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठ प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या सत्याग्रहात अडथळा आणू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
---------------------
दरम्यान, सत्याग्रहाचा तंबू सील केल्यामुळे भदंत विमांसा मागील महिनाभरापासून जमिनीवर झोपत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब समजताच एका बौद्ध उपासकाने त्यांना अंथरूण देण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘मी सत्याग्रहावर असून, प्रशासन जितका त्रास देईल तो सहन करण्यास तयार आहे; मला कोणतीही वैयक्तिक मदत नको,’ असे सांगत भदंत विमांसा यांनी ती मदत नम्रपणे नाकारली. त्यांच्या सत्याग्रहाला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मानवी हक्क संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचेही सांगण्यात आले.

धारावी : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर दिग्दर्शक डॉ. आनंद पटवर्धन यांना सुरक्षा यंत्रणेकडून अडविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT