मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनभोजनाच्या पार्ट्या

CD

जंगल सुरक्षेवर प्रश्न
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनभोजनाचा ट्रेंड; वणव्याचा धोका!

ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) : मुंबई-ठाण्याचे ‘मिनी माथेरान’ समजल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरात सध्या पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, उन्हाळ्याचा गारवा अनुभवण्यासाठी येणारी ही हौशी मंडळी चक्क जंगलाच्या हद्दीत वनभोजनाच्या पार्ट्या झोडत असून, तिथे पेटवल्या जाणाऱ्या चुलींमुळे हिरव्यागार वनसंपदेला वणव्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

येऊर परिसरात नैसर्गिक सौंदर्य आणि गारव्यामुळे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. नियमानुसार राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात सहली किंवा वनभोजन करण्यास सक्त मनाई आहे. तरीही, काही पर्यटक आदिवासी पाड्यांमधील रिकाम्या शेतीचा आधार घेऊन तिथे वनभोजनाचे बेत आखत असल्याचे चित्र दिसत आहे. भात कापणीनंतर रिकाम्या झालेल्या शेतात आदिवासींना ठरावीक शुल्क देऊन हे पर्यटक तिथेच चुली पेटवून स्वयंपाक करत आहेत. उन्हाळ्यात जंगलातील गवत आणि पालापाचोळा पूर्णपणे कोरडा असतो. अशा वेळी वनभोजनासाठी पेटवलेली एक ठिणगीही भीषण वणव्याला निमंत्रण देऊ शकते. डोंगरदऱ्यांत आग लागल्यास ती विझवणे कठीण असते, तरीही पर्यटकांकडून या जीवघेण्या धोक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वनभोजन करण्यास मनाई असली, तरी येथे अनेक आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांतील आदिवासी पावसाळ्यात भातशेती करतात. भात काढणी झाल्यानंतर रिकाम्या शेतात काही पर्यटक आदिवासींना शुल्क देऊन वनभोजनाच्या पार्ट्या आयोजित करतात. यासाठी लागणारे अन्नपदार्थ व पेये ते स्वतःसोबत घेऊन येतात; मात्र या ठिकाणी पेटविल्या जाणाऱ्या चुलींमुळे जंगलात वणवे लागण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात जंगलातील कोरडे गवत आणि पाने यामुळे आग झपाट्याने पसरू शकते. तरीही या धोक्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

वन विभागाची सज्जता आणि गस्त
वणव्याच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. विनापरवाना जंगलात प्रवेश करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू असून, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षक भिंती आणि चौक्या उभारण्यात आल्या आहेत. आग पसरू नये म्हणून जंगलात ठिकठिकाणी ‘फायर लाइन’ तयार करण्यात आल्या आहेत. आग लागल्यास ती तत्काळ विझवण्यासाठी आधुनिक ‘फायर ब्लोअर’ यंत्रणा सज्ज आहे. वनरक्षक आणि कर्मचारी परिसरात रात्रंदिवस गस्त घालत आहेत.

जंगलात आग लागू नये म्हणून आम्ही सर्वत्र फायर लाइन तयार केल्या आहेत. आग लागल्यास ती तातडीने विझवण्याची यंत्रणा आमच्याकडे सज्ज आहे. वन क्षेत्रात सतत गस्त घातली जात असून, विनापरवाना कोणाही आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
- मयूर सुरवसे (वन परिक्षेत्र अधिकारी, येऊर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Navy Deployment: फ्रान्सची युद्धनौका भूमध्य समुद्रात, मॅक्रॉन, मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी आदेश

अय्यो, ही तर डिट्टो कॉपी! रश्मिका मंदाना सेम टू सेम दिसते आईसारखी! सोशल मीडियावर Viral Video

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर नगरसेवकांचा डल्ला? अंदाजपत्रकात ३०० कोटींच्या वाढीची शक्यता

"माझ्या मृत्यूला कुटूंब जबाबदार.." प्रसिद्ध युट्युबरचा धक्कादायक Video; या कारणामुळे करतोय डिप्रेशनचा सामना

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

SCROLL FOR NEXT