मुंबई

शिवजयंतीनिमित्त ''कल्याण केसरी'' कुस्ती स्पर्धेचे आयोजन

CD

शिवजयंतीनिमित्त ‘कल्याण केसरी’ कुस्ती स्पर्धा
मॅटवरील चुरशीच्या लढती पाहण्याची क्रीडाप्रेमींना पर्वणी

कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमध्ये भव्य आणि रोमहर्षक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य’ (कल्याण-डोंबिवली शहर) आणि ‘श्री प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ मार्च रोजी मानाच्या ‘कल्याण केसरी’ लढतीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमुळे कल्याण परिसरातील कुस्तीप्रेमींना रांगड्या खेळाचा रोमांच अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

कुस्तीच्या आधुनिक तंत्राला चालना देण्यासाठी या स्पर्धेतील सर्व लढती वजनगटानुसार मॅटवर खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पैलवानांचे वजन स्पर्धेच्या दिवशी, रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मैदानावरच करण्यात येणार आहे. या स्पर्धेत कल्याण, ठाणे, मुंबई उपनगर आणि रायगड या परिसरातील मल्लांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. ‘कल्याण केसरी’ची मानाची गदा जिंकण्यासाठी अनेक नामांकित पैलवान आपले कसब पणाला लावणार असल्याने या लढतींमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बहुचर्चित कुस्ती स्पर्धा कल्याण पश्चिम येथील चिक्कणघर परिसरातील रामबाग ४ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या लढती रात्री ९ वाजेपर्यंत रंगणार आहेत. दरम्यान, जे कुस्तीप्रेमी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी या स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील कुस्तीप्रेमींनाही घरबसल्या या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

स्पर्धेची तयारी पूर्ण
स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे मुख्य आयोजक, ‘श्री प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि ‘कुस्ती मल्लविद्या कल्याण-डोंबिवली शहर’चे अध्यक्ष पैलवान जितेंद्र भगत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT