नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : होळी आणि धूलिवंदन सण शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावेत, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ (वाशी) आणि नवी मुंबई वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून नियम मोडणाऱ्या शेकडो वाहनचालकांवर व अवैध कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली वाशी, तुर्भे, कोपरखैरणे यासह एकूण सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ३० ठिकाणी नाकाबंदीदरम्यान मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या नाकाबंदीदरम्यान ३३ जणांवर ड्रंक ॲण्ड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आठ, तर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या २९ जणांवर कारवाई केली, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०८ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच कोफ्टा कायद्यांतर्गत १४, तर सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या १२ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच वाहतूक पोलिसांकडून एकूण १,३३८ वाहचालकांवर कारवाई करण्यात आली.
नियमाचा प्रकार कारवाई
मद्यपी चालक १०६
विनाहेल्मेट दुचाकीस्वार ७१४
विना सीटबेल्ट कारचालक १५०
इतर वाहतूक नियम मोडणे ३६८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.