मुंबई

हॉल तिकीट मिळवून देतो म्हणत शिपायाने विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळले;

CD

बदलापुरात शिक्षण व्यवस्थेला धक्का!
हॉल तिकिटाच्या बहाण्याने शिपायाने उकळले हजारो रुपये

बदलापूर, ता. ५ (बातमीदार) ः बदलापुरातील शिक्षण व्यवस्थेला धक्का देणारी घटना बदलापूरच्या एका महाविद्यालयात घडल्याचे उघडकीस आले आहे. बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट मिळवून देतो, असे सांगत महाविद्यालयातील एका शिपायाने दोन विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा प्रकार गुरुवारी (ता. ५) समोर आला असून, ऐनवेळी हॉल तिकीटच न मिळाल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेला उपस्थित राहता आले नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाविद्यालयाकडून संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.
बदलापूर कानिफ कोकणे आणि ओम मस्तूद हे दोघे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी १७ क्रमांकाचा फॉर्म भरण्यासाठी आदर्श महाविद्यालयात गेले असता, त्यांना फॉर्म भरण्याची मुदत संपल्याचे सांगण्यात आले. याच वेळी महाविद्यालयातील हरेश मांडवकर या शिपायाने त्यांना मी महाविद्यालयात लिपिक म्हणून कामाला असल्याचे भासवत ‘मी तुमचा फॉर्म भरून देतो आणि हॉल तिकीट मिळवून देतो,’ असे सांगत या विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले. या बदल्यात त्याने कानिफ कोकणे याच्याकडून पाच हजार ४०० रुपये आणि ओम मस्तूद याच्याकडून चार हजार ८०० रुपये असे जवळपास १० हजार रुपये घेतले. त्यानंतर जवळपास महिनाभर हा शिपाई विद्यार्थ्यांना वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ करीत राहिला. कधी हॉल तिकिटामध्ये स्पेलिंगची चूक असल्याचे सांगितले, तर कधी दुरुस्तीसाठी पाठवले असल्याचे कारण देत विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. दरम्यान, बारावीची परीक्षा सुरू झाली तरी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही. इतकेच नव्हे तर परीक्षा सुरू झालेल्या दिवशी संबंधित शिपाई महाविद्यालयातही आला नाही आणि त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांसह महाविद्यालयात धाव घेत मुख्याध्यापिकांची भेट घेतली असता, संबंधित व्यक्ती कर्मचारी नसून केवळ शिपाई असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर संतप्त पालकांनी पोलिस तसेच महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
.........
महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिपायाला नोटीस बजावली असून चौकशीसाठी समिती गठित केली आहे. तसेच यापूर्वीदेखील या शिपायाने अशाच प्रकारे विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार समोर आली असून, या सगळ्या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करणार आहोत आणि दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत. पालकांनीदेखील भविष्यात अशी फसवणूक होऊ नये, यासाठी मुख्याध्यापक किंवा संचालक मंडळातील जबाबदार व्यक्तीची भेट घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
- तुषार आपटे, सचिव, आदर्श विद्या प्रसारक मंडळ
.........
आम्हाला या घटनेमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेची पूर्ण तयारी केली होती. त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आमच्या मुलांना मानसिक धक्का बसला आहे. आमच्या मुलांनी वर्षभर मेहनत करून बारावीच्या परीक्षेची तयारी केली होती. मात्र एका कर्मचाऱ्याच्या फसवणुकीमुळे त्यांना परीक्षेलाच बसता आले नाही, ही अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक बाब आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातच अशी फसवणूक होत असेल तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? या प्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
- रमेश कोकणे, कानिफ कोकणे विद्यार्थ्याचे पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

SCROLL FOR NEXT