पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; पती अटकेत
तारापुर, ता. ५ (बातमीदार) : साखरे पाटीलपाडा परिसरात मंगळवारी (ता. ३) होळीच्या सणासुदीला पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील प्रकरणाचा तपास वाणगाव पोलिस करीत आहेत.
साखरे पाटीलपाडा येथे राहणारे बाबू लाडक्या घाटाळ (६५) आणि नर्बद बाबू घाटाळ (६०) हे पती-पत्नी असून, दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वारंवार वाद होत होते. मंगळवारी (ता. ३) झालेल्या वादातून संतापाच्या भरात बाबू घाटाळ याने पत्नी नर्बद घाटाळ हिच्यावर कुऱ्हाडीने गळ्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात नर्बद घाटाळ हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वाणगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी नातेवाईक डिंपल सुभाष घाटाळ हिच्या फिर्यादीवरून वाणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बाबू लाडक्या घाटाळ यास पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास वाणगाव पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.