मुंबई

डोंबिवलीत हिरक महोत्सवी संमेलन उत्साहात

CD

डोंबिवलीत हिरक महोत्सवी संमेलन उत्साहात
डोंबिवली, ता. ५ : येथील ‘काव्यरसिक मंडळाच्या’ हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दोनदिवसीय संमेलन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी गणेश मंदिर परिसरातील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. संमेलनाचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा मेघना पाटील, ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, कवी दासू वैद्य आणि हेमंत जोगळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये ‘काव्यकस्तुरी’, ‘काव्यांजली’ आणि ‘गझल मुशायरा’ असे भरगच्च कार्यक्रम झाले. अन्वर मिर्झा, संकेत म्हात्रे, अशोक नायगावकर, किरण येले यांसारख्या नामवंत कवींनी यात सहभाग घेतला. ‘एकविसाव्या शतकातील कविता’ या विषयावर झालेल्या परिसंवादाने आधुनिक कवितेचे विविध पैलू रसिकांसमोर उलगडले. या सोहळ्यात प्रशांत पनवेलकर, अशोक सोनवणे, डॉ. आदिती काळमेघ (काव्यसंग्रह), प्रशांत पोरे (गझलसंग्रह) आणि महानंदा मोहिते (काव्योन्मेष) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संमेलनाच्या समारोपप्रसंगी मावळत्या अध्यक्षा मेघना पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष महेश देशपांडे यांचे स्वागत केले. दोन दिवस चाललेल्या या काव्यसोहळ्याला डोंबिवलीतील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Central Railway: मध्य रेल्वेची मोठी कारवाई! तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या १६ लाख प्रवाशांना दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल थक्क

Onion Price Cras : आखातातील युद्ध ठरणार शेतकऱ्यांसाठी काळ? निर्यातीला ब्रेक लागल्याने कांद्याचे दर मातीमोल

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

SCROLL FOR NEXT