मुंबई

गोठ्यात घुसून बिबट्याने तीन वासरांचा केला फडशा

CD

बिबट्याची दहशत; हल्ल्यात तीन जनावरांचा मृत्यू

कर्जत, ता. ५ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील तुंगी गावात आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून तीन गोवंशीय जनावरांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन गोऱ्हे आणि एक कालवड मृत्युमुखी पडली असून, शेतकरी हनुमान शिवाजी सुपे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ४) मध्यरात्री जनावरे गोठ्यात बांधलेली असताना हिंस्त्र प्राण्याने गोठ्याच्या खिडकीतून उडी मारून आत प्रवेश करून जनावरांवर हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनाधिकारी समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडस येथील वनपाल व राउंड स्टाफ यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व नुकसानीचा अहवाल तयार केला. तसेच ग्रामस्थांना वन्यप्राण्यांपासून बचावासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांनी जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवावीत, परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा, लहान मुलांना संध्याकाळनंतर घराबाहेर जाऊ देऊ नये तसेच रात्री बाहेर पडताना बॅटरी घेऊन किंवा समूहानेच बाहेर पडावे, यापूर्वी झालेल्या नुकसानीची रक्कम लाभार्थ्यांला वन विभागामार्फत देण्यात आलेली आहे. त्यामुळे हल्ला करणाऱ्या वन्यप्राण्याला कोणतेही नुकसान करू नये, असे आवाहन परिक्षेत्र वनाधिकारी समीर शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT