मुंबई

व्हायरल व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

CD

व्हायरल व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
वांद्रे परिसरातील कचरा-अतिक्रमणाबाबत ‘वास्तव स्थिती’ मांडली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील कचरा आणि रुळांलगतच्या अतिक्रमणाचे व्हिडिओ काही विदेशी पर्यटकांनी समाजमाध्यमावर शेअर केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओंची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने वांद्रे स्थानक परिसरातील परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रुळांची नियमित स्वच्छता केली जात असून, नव्याने होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी स्थानिक महापालिका आणि पोलिसांशी समन्वय साधून प्रयत्न सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले. दरम्यान, या परिसरातील मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे व्यापक कारवाईवर काही मर्यादा येत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, वांद्रे (पूर्व) परिसरातील रेल्वे रुळांची स्वच्छता अभियांत्रिकी विभागाकडून नियमितपणे केली जाते. यासाठी ‘मक स्पेशल’ गाड्यांच्या मदतीने रुळांजवळ साचलेला कचरा हटवला जातो, जेणेकरून रेल्वे वाहतूक सुरक्षित राहते. या परिसरातील रेल्वेची जमीन मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित झाली आहे. या अतिक्रमणाबाबतचा प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तातडीने कारवाई करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे रेल्वेला काही कायदेशीर मर्यादांमध्ये काम करावे लागत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तरीही, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि संबंधित विभागांकडून नव्याने होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी नियमित कारवाई केली जाते. नवीन अनधिकृत झोपड्या किंवा बांधकामे आढळल्यास त्यावर पाडकाम मोहिमा राबविल्या जात असल्याचे रेल्वेने सांगितले.

कचऱ्याची समस्या कायम
रुळांजवळ मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्याबाबत रेल्वेने सांगितले की, आसपासच्या झोपडपट्ट्यांमधून कचरा टाकला जात असल्यामुळे ही समस्या निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून महापालिका आणि शहर पोलिसांसोबत समन्वय साधून दररोज कचरा उचलण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओंमुळे वांद्रे परिसरातील स्वच्छता आणि अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या समस्येवर रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने संयुक्तपणे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

काय होता व्हिडिओ?
 विदेशी पर्यटकांनी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील परिस्थितीचे व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर केले होते. या व्हिडिओंमध्ये रुळांजवळ साचलेला कचरा,  रेल्वे रुळांच्या अगदी जवळ उभारलेल्या झोपड्यांची दृश्ये दिसत होती. एका पर्यटकाने व्हिडिओमध्ये “हे रेल्वे स्थानक आहे की कचराकुंडी..? असा प्रश्न उपस्थित करत परिसरातील स्वच्छतेबाबत आश्चर्य व्यक्त केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

SCROLL FOR NEXT