मुंबई

स्त्री बीज तस्करी प्रकरणाचा तपास जळगावपर्यंत; अटक सतीश चौधरीला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी!

CD

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाला नवे वळण
जळगावमधून एक संशयित पोलिसांच्या अटकेत

बदलापूर, ता. ५ (बातमीदार) ः राज्यभरात चर्चेत असलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणाच्या तपासात बदलापूर पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथून सतीश चौधरी या संशयिताला बुधवारी (ता. ४) सायंकाळी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी या प्रकरणात चार महिला, एक मेडिकल चालक तसेच नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचा डॉक्टर अमोल पाटील याला अटक करण्यात आली होती. या सर्वांच्या चौकशीतून समोर आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी सतीश चौधरीपर्यंत धाव घेतली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सतीश चौधरी हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा मानला जात असून, ठाण्यातील सेंटरची जबाबदारी सांभाळण्यासोबतच स्त्रीबीजाचे सॅम्पल नाशिकला पोहोचवणे, आधार कार्डमध्ये फेरफार करणे तसेच बनावट कागदपत्रे तयार करणे, अशी महत्त्वाची कामे तो करत होता. डॉक्टर अमोल पाटील याला अटक झाल्यानंतर या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असावेत, असा संशयही व्यक्त होत आहे. डोनर महिलांना अत्यल्प पैसे देऊन त्यांचे स्त्रीबीज कोट्यवधी रुपयांना विकले जात असल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, नाशिक आणि जळगाव या शहरांमधून आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास अधिक वेगाने सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

Sharad Pawar: मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री… शरद पवारांनी आठवला राजकीय प्रवास; उमेदवारीनंतर भावनिक पोस्ट लिहिली

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

SCROLL FOR NEXT