मुंबई

‘त्या’२७ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले!

CD

‘त्या’२७ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले!
- आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीला यश
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : कासारवडवली भागात असलेल्या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभर शिक्षण घेतले, पण ज्यावेळी परीक्षेला बसण्याची वेळ आली त्या वेळी मान्यतेसाठी आवश्यक परिपूर्तता संबंधित कॉलेजने विद्यापीठाकडे केली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले होते. या विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी त्वरित उप कुलगुरूंची भेट घेत यासंदर्भात तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानंतर विद्यापीठाने याची तत्काळ दखल घेत समितीची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना मान्यता दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता आल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले.
मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला २७ विद्यार्थ्यांच्या विलंबित प्रवेशाच्या कारणावरून संस्थेच्या डिग्री कॉलेजला लाखो रुपयांचा दंड आकारला होता. परीक्षेच्या तोंडावर ही बाब उघडकीस आल्याने सर्वसामान्य पालक हवालदिल झाले होते. या विद्यार्थ्यांनी भाजपचे सूरज दळवी यांच्या माध्यमातून ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. विद्यापीठाच्या नियमानुसार २१ ते ४० विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयास १० लाख रुपये दंड अधिक प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात येते. तसेच महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून २५ टक्के इतकी कपात करून चौकशी समिती गठित करावी. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांस पाच हजार रुपये दंड आकारण्यात यावा. याबाबतचे पत्र विद्यापीठाने ज्ञानगंगा शिक्षण संस्थेस पाठवले आहे. मात्र संस्थेने विद्यापीठाची प्रवेशाची लिंक बंद-चालू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला विलंब झाला असे सांगितले. हा लाखोंचा दंड विद्यार्थ्यांनी भरल्याशिवाय त्यांचा प्रवेश कायदेशीर ठरणार नव्हता. याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी केळकर यांना साकडे घातले होते. आमदार संजय केळकर यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू भांबरे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय निदर्शनास आणून दिला. या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास नकार देण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्याचे केळकर यांनी सांगितले. याबाबत महाविद्यालय प्रशासनाला समज देऊन विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी वैयक्तिक लक्ष घालू, असे आश्वासन दिले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीदेखील त्यांचे म्हणणे उपकुलगुरूंसमोर मांडले होते.
अखेर या विद्यार्थ्यांना फक्त पाच हजार रुपये विलंब शुल्क भरून परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT