मुंबई

सेवा कुंभ उपक्रमाला ठाणेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

CD

सेवा कुंभ उपक्रमाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत सेवा विभाग आयोजित सेवा प्रकल्पाची माहिती देणाऱ्या ‘एकदिवसीय सेवा कुंभा’ला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी (ता. १) सामाजिक कार्याची माहिती देणारे एकदिवसीय प्रदर्शन सेवा कुंभ स्वरूपात ठाणे येथील श्रीराम व्यायामशाळा संस्था आणि गडकरी रंगायतन येथे पार पडले. कोकण प्रांत सेवाप्रमुख श्रीकांत पुराणिक यांनी प्रास्ताविक केले.
विश्व हिंदू परिषद केंद्रीय सेवा मार्गदर्शक मंडळ सदस्य नंदलाल लोहिया यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. सेवाकार्यामुळे होणारा समाजाचा विकास, हिंदुत्व विचारांचा प्रसार आणि आध्यात्मिक प्रगतीसाठीदेखील सेवाकार्यात सहभागी होण्याची देण्याची आवश्यकता यावर नंदलाल लोहिया यांनी भाष्य केले. सेवाकार्य सद्य:स्थिती, विस्तार आणि प्रश्न सोडवणे यावर विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित, प्रांत कार्यकारिणी सदस्य माधव बर्वे, सहमंत्री अजय मुडपे यांनी अनुक्रमे संस्था विश्वस्त, संचालक, वसतिगृह अधीक्षक आणि सेवाप्रमुख यांनी चर्चासत्र घेतले. या वेळी वनवासी कल्याण केंद्र तलासरी, मातृछाया गोमांतक, विद्या विकास मंदिर नेरळ, भगिनी निवेदिता मंडळ आनगाव (भिवंडी), सफाळे येथील महिला कौशल्य विकास केंद्र, शिक्षालय गोरेगाव, शिवकल्याण केंद्र संचालित संस्कार शाळा, रुग्णाश्रय याबाबत माहिती देण्यात आली. या सर्व प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रत्येक प्रकल्पाचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच मल्लखांब, वंदे मातरम्, मोबाईलचे दुष्परिणाम, पारंपरिक भजन आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या विषयांवर सादरीकरण करण्यात आले. गडकरी रंगायतन येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमाला केंद्रीय अधिकारी नंदलाल लोहिया, कबीरदास मठाचे महंत संत महावीर दास, रामदास सेवा आश्रमाचे परागबुवा रामदासी, औरम उद्योगाचे आशीष देवरा, पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, सेवा कुंभ स्वागत समिती अध्यक्ष दिनेश तहलियानी हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT