मुंबई

बनावट आधार कार्डद्वारे महिलांची ओळख बदलली

CD

बनावट आधार कार्डद्वारे महिलांची ओळख बदलली
बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरण

राहुल क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरणाचे ठाणे कनेक्शन समोर आल्यानंतर आरोग्य विभाग अधिक सक्रिय झाला असून, या प्रकरणाचा खोलवर तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी नसलेल्या महिला इंजेक्शन देणे, औषध देणे अशा गोष्टी करीत होत्या. महिलांची ओळख पटू नये, यासाठी महिलांची बनावट आधार कार्ड बनवून त्यांची ओळख बदलली जात असल्याची गंभीर बाब तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील काही दिवसांपासून बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाचे ठाणे आणि नाशिक कनेक्शन उघड झाल्यानंतर ठाण्यातील गावदेवी येथील आयव्हीएफ केंद्रावर आरोग्य विभागाने कारवाई केली. या कारवाईनंतर या प्रकरणाचा खोलवर तपास केल्यानंतर याचे जाळे राज्यसह राज्याबाहेरदेखील पसरलेली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच या प्रकरणात नाशिक येथील डॉ. अमोल पाटील याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील ही सहावी अटक ठरली असून पोलिसांनी या संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी अधिक व्यापक प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान स्त्रीबीज विक्री कशाप्रकारे सुरू होती, याची सविस्तर माहिती आता पुढे येऊ लागली आहे. महिला बीज एकदाच दान करू शकते, असा कायदा आहे; मात्र बेकायदा स्त्रीबीज विक्रीत अडथळा येऊ नये, यासाठी महिलांची बनावट आधार कार्ड बनवून त्यांची ओळख बदलली जात होती आणि त्या बनावट नावानेच प्रवास करीत होत्या, असे तपासात समोर आले आहे.
...
३० ते ३५ दलाल कार्यरत
आयव्हीएफ केंद्राचे ३० ते ३५ दलाल कार्यरत होते. हे दलाल पैशांची गरज असलेल्या महिलांना हेरून त्यांना पैशांचे प्रलोभन दाखवत स्त्रीबीज विकसित करण्यास प्रवृत्त करायचे. यानंतर या महिलांची सोनोग्राफी करून त्यांच्या स्त्रीबीजांच्या आकाराची माहिती घेत. ज्या महिलांची स्त्रीबीजे चांगली असतील, त्या महिलांचे बनावट आधार कार्ड बनवले जायचे. यानंतर राज्य आणि राज्याबाहेरील केंद्रात त्यांना पाठवून त्यांची स्त्रीबीजे काढून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...
पैशांचे प्रलोभन
स्त्रीबीज बेकायदा विक्री प्रकरण बदलापूर पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर त्याची पाळेमुळे राज्य आणि राज्याबाहेर पसरलेली असल्याची माहिती पुढे येत आहे. गरजू महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्या शरीरात स्त्रीबीज विकसित करून ते काढून बेकायदा विक्री केली जात होती. त्यासाठी महिलांना १८ ते २५ हजार रुपये दिले जात होते, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

SCROLL FOR NEXT