मुंबई

नागरी समस्या सोडवण्याला प्राधान्य

CD

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : शहरातील नागरिकांना उत्तम आणि सुलभ नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि भविष्यातील परिवहन व्यवस्था सुधारण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन भिवंडीचे महापौर नारायण चौधरी यांनी केले.
महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या सोमवारी (ता. ३) महापौर दालनात पदभार स्वीकारला. यावेळी समर्थक, पदाधिकारी आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला. शहरातील पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, नियमित स्वच्छता व्यवस्था, नागरिकांसाठी सक्षम आरोग्य सेवा, दर्जेदार शिक्षण सुविधा आणि भविष्यातील परिवहन सेवा यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना चांगल्या आणि सुलभ नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर तारिक मोमिन, पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक उपस्थित होते. नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग आणि प्रशासनाचे सहकार्य यांच्या बळावर भिवंडी शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि निरोगी करण्याचा विश्वास महापौर नारायण चौधरी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

SCROLL FOR NEXT