भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : शहरातील पाणीपुरवठा अनियमित होत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच भिवंडीत पाणीचोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण साडेपाच लाख रुपयांच्या पाणीचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
महापौर नारायण चौधरी आणि आयुक्त अनमोल सागर यांनी पाणीचोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सरफराज अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली पथकप्रमुख विराज भोईर, सहाय्यक पथकप्रमुख नफीस मोमीन, रत्नदीप भालेराव आणि कनिष्ठ अभियंता अरफात खान यांच्या पथकाने ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत नाशिक रोडवरील अवचितपाडा येथे शेख मेराज खलील अहमद यांनी त्यांच्या सर्व्हिस सेंटरसाठी महापालिकेची परवानगी न घेता जलवाहिनीला छिद्र पाडून अर्धा इंच व्यासाची नळजोडणी केल्याचे आढळून आले. यातून ते पाणी वापरत असल्याने महापालिकेचे ९९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. याप्रकरणी विराज भोईर यांच्या तक्रारीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत नारपोली येथील चौथाणी कम्पाउंडमध्ये मुन्नवर नसीम खान यांनी पालिकेची परवानगी न घेता जलवाहिनीला अनधिकृत नळजोडण्या घेतल्या होत्या. त्यानंतर एका गाळ्यात पाच हजार लिटर क्षमतेच्या सात टाक्यांमध्ये पाणी साठवून मिनीडोअरच्या माध्यमातून हॉटेल, डायिंग आणि सायझिंग उद्योगांना पाणी विक्री केल्याचे आढळून आले.
या ठिकाणाहून पाच हजार लिटर क्षमतेच्या सात पाण्याच्या टाक्या, तीन मोटार आणि एक सबमर्सिबल पंप जप्त करण्यात आला. या प्रकारात चाल लाख ६८ हजार रुपयांची पाणीचोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून, नारपोली पोलिस ठाण्यात मुन्नवर नसीम खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.