मुंबई

नवी मुंबईत धुळवड उत्साहात साजरी

CD

तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबईत प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली. पाण्याचा सडा टाकून त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटून सजवलेली होळी, भक्तिभावाने केलेले तिचे विधिवत पजून, कापराच्या साह्याने होम पेटवल्यानंतर हातातील डमरू व डफ वाजवत ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ असे ओरडत त्याभोवती नाचणाऱ्या बाळगोपाळांचा जल्लोष सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. चौकाचौकांत भव्य होळी पेटवल्या गेल्या होत्या. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या, तर आयुष्यातील मोलाचे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आघाडीवर असणाऱ्या तरुणाईने होळीच्या सणालादेखील ही संधी सोडले नाही. अनेकांना पेटलेल्या होळीच्या आकाशाकडे झेपावत असलेल्या ज्वाळा मोबाईल व कॅमेऱ्यामध्ये टिपल्या.

होळीच्या दिवशी महाविद्यालय आणि शाळा सुरू असल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी आपल्यासोबत विविध प्रकारची रंग घेऊन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला रंगवायचे याच इराद्याने आले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या व शाळेच्या प्रांगणात होळीचा जल्लोष होता. लाल, हिरवा, निळा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगांची उधळण होऊन ‘होळी’च्या आवाज परिसरात घुमला.

वेगाने आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई शहरातही गावठाणांची संस्कृती आजही तितक्याच उत्साहाने जपली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः नवी मुंबई शहरातील गावागावात, तसेच कोळीवाड्यांमध्ये आगरी-कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने ‘होलिकोत्सव’ साजरा करून संस्कृतीची परंपरा जिवंत ठेवली आहे.

होळीभोवती फेर
बेलापूर परिसरातील दिवाळे कोळीवाडा येथे होळीच्या मध्यरात्री विधीपूर्वक होळी प्रज्वलित करण्यात आली. गावच्या वतीने पाटील दाम्पत्यांना मान देत त्यांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. त्यानंतर कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करत होळीभोवती फेर धरला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जोय जाय, जोय जाय’ अशा पारंपरिक गजरात परिसर दुमदुमून गेला. यामुळे खऱ्या अर्थाने उत्सवाला उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Oil News: UAE ने OPEC ला दिला धक्का! 50 वर्षांनंतर बाहेर पडण्याचा निर्णय; जागतिक आणि भारतीय तेल बाजारावर काय होणार परिणाम?

UP Cheap Electronics: पंख्याच्या किमतीत कूलर आणि अर्ध्या दरात एसी! 'या' मार्केटमध्ये मिळते स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मेजवानी!

Latest Marathi News Live Update: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

कच्चं तेल १११ डॉलरच्या वर, अनेक देशात इंधन दराचा भडका; हाँगकाँगमध्ये पेट्रोल सर्वात महाग, ३९३ रुपये प्रति लीटर

मुंबइचा जलसम्राट आर्यनचा गोव्यात विश्वविक्रम; रात्रंदिवस सलग २१० किलोमीटर समुद्रात पोहून रचला इतिहास

SCROLL FOR NEXT