मुंबई

विशेष समित्यांवरील सदस्यांची निवड बिनविरोध

CD

वाशी, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील विविध विशेष समित्या, तदर्थ समित्या, तसेच प्रभाग समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (ता. ५) सर्व पदांवर सदस्यांची निवड बिनविरोध झाली. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक घेण्याची आवश्यकता भासली नाही. महत्वाचे म्हणजे, आठ प्रभाग समित्यांपैकी सात समित्यांवर भाजपचे सभापती निवडून आले असून एका समितीवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नगरसेविकेला संधी मिळाली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजात विविध विषय समित्यांना महत्त्वाचे स्थान आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, सामाजिक कल्याण, महिला व बालकल्याण, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांशी संबंधित निर्णय या समित्यांमार्फत घेतले जातात. त्यामुळे समित्यांवरील पदाधिकारी निश्चित झाल्यानंतर विविध विषयांवरील निर्णय प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिका मुख्यालयात बुधवारी (ता. ४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्जांची छाननी करून प्रत्येक पदासाठीचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे विविध समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांवरील निवड बिनविरोध झाल्याची गुरुवारी सभागृहात घोषणा करण्यात आली.

बिनविरोध निवड
समिती सभापती उपसभापती
महिला व बालकल्याण दत्ता जाधव रुपाली भगत
आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती डॉ. जयाजी नाथ गणेश सपकाळ
पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती रविकांत पाटील डॉ. प्रणाली पाटील
क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समिती गिरीश म्हात्रे राजू मढवी
समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती रंजना सुधाकर सोनावणे सुरेखा नरबागे
विधी समिती सायली शिंदे शिवाजी खोपडे

तदर्थ समित्यांची निवड
संबंधित समिती सभापती
नगररचना विभाग सूरज पाटील
आरोग्य विभाग डॉ. जयाजी नाथ
औद्योगिक वसाहती शशिकांत राऊत
महापालिका कामकाज पुस्तिका समिती सागर नाईक
इतर सर्व विभागातील कामकाज सुधाकर सोनवणे

भाजपचे निर्विवाद वर्चस्व
महापालिकेच्या ‘अ’ ते ‘एच’ अशा एकूण आठ प्रभाग समित्यांच्या सभापती पदांसाठीही प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्वांची निवड बिनविरोध झाली. या आठ समित्यांपैकी सात समित्यांवर भाजपचे सभापती निवडून आले असून एका समितीवर (‘जी’ प्रभाग) शिवसेनेच्या (शिंदे) नगरसेविका हेमंगी सोनवणे यांची निवड झाली आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व स्पष्ट झाले आहे.

प्रभाग समितीवर निवड
अ दीपक पवार
ब रुपाली भगत
क शैला पाटील
ड प्रकाश मोरे
इ चंद्रभागा मोरे
फ ललिता मढवी
जी हेमांगी सोनवणे
एच भरत भोईर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई यांच्या हत्येनंतर भारताकडून शोक व्यक्त; इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी

Pune News : कमी दराच्या निविदांचा होणार बंदोबस्त; स्थायी समितीतील बैठकीमुळे ठेकेरादांचे धाबे दणाणले

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

SCROLL FOR NEXT