मुंबई

कोपरखैरणेत क्लास सुरू असताना इमारतीचा स्लॅब कोसळला !

CD

शिकवणी वर्गावर इमारतीचा स्लॅब कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू
कोपरखैरणेतील घटनेत पाच जखमी

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : कोपरखैरणे परिसरात गुरुवारी (ता. ५) सेक्टर-२ मधील विद्या भवन या चारमजली इमारतीचा स्लॅब तळमजल्यावरील शिकवणी वर्गावर कोसळून १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यात एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना प्रथमोपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विद्या भवन सोसायटी या २८ वर्षे जुन्या इमारतीत सायंकाळी ५:२०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या वर्गात शिक्षिका शामली चौधरी (५३) मुलांना शिकवत असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत मनीष राहुल म्हसे (१४) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत २८ वर्षे जुनी असून तिची अवस्था धोकादायक होती. या इमारतीमध्ये १६ कुटुंबे राहत होती. दरम्यान, या दुर्घटनेमुळे जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, प्रशासनाकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
...
१३ जणांची सुटका
ढिगाऱ्याखाली अडकलेले १२ विद्यार्थी आणि शिक्षिका अशा एकूण १३ जणांना जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. बचाव करण्यात आलेल्यांमध्ये सिद्धांत गुप्ता (८), प्रिन्स सोनी (११), आयशा, कुसुम (१५), निष्का धनवाडे (१४), आराध्या बोडसे (१४), तन्वी श्रीवास्तव (७), देवांश पुजारी (१२), राजदीप वानखडे (१०), पार्थ खैरनार (१४), रुद्र येलूरकर (५) आणि शिक्षिका शामली चौधरी (५३) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

SCROLL FOR NEXT