मुंबई

शिष्यवृत्ती परीक्षेच्या नोंदणीसाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ

CD

शिष्यवृत्ती परीक्षेच्या नोंदणीसाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ
मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) २६ एप्रिलला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता नियमित शुल्कासह ६ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ३० डिसेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. तथापि शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र/ शुल्क भरणा करण्याकरिता वाढीव मुदत मिळण्यासाठी परीक्षा परिषदेस अनेक शाळांकडून विनंती प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. विलंब शुल्कासह ८ मार्च आणि अतिविलंब शुल्कासह १० मार्चपर्यंत ही मुदत असेल.

या परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाइन आवेदनपत्र भरली नसतील त्यांनी दिलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करावी. १० मार्च २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Alandi News : आळंदी इंद्रायणी घाटावर महिलांमार्फत खुलेआम मद्यविक्री, धार्मिक स्थळांचे विडंबन

Sharad Pawar: मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री… शरद पवारांनी आठवला राजकीय प्रवास; उमेदवारीनंतर भावनिक पोस्ट लिहिली

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

SCROLL FOR NEXT