मुंबई

खंडणी प्रकरणातील चार फरार आरोपी अटकेत

CD

खंडणी प्रकरणातील
चार आरोपी अटकेत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील चार फरार आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने आज गुरुवारी (ता. ५) अटक केली आहे. किसननगर परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी श्रीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खंडणीविरोधी पथकातील पोलिस हवालदार शिंदे यांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तातडीने सापळा रचून बुधवारी (ता. ४) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास किसननगर परिसरातील सिद्धेश प्रमोद लांजेकर (२७), प्रशांत प्रमोद लांजेकर (३०), तुळशीधाम येथील सागर सतीश मोकाशी (३०) आणि वागळे इस्टेट परिसरातील करण डिनसन (२०) या चारही जणांना ताब्यात घेत अटक केली व त्यांना पुढील कारवाईसाठी श्रीनगर पोलिस ठाण्यात रवाना करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Latest Marathi News Update : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT