आश्रमशाळेच्या वसतिगृहाला भीषण आग
विद्यार्थ्यांचे साहित्य खाक
कासा, ता. ५ (बातमीदार) : डहाणूतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कांदरवाडी येथील सूर्यनगर आश्रमशाळेच्या वसतिगृहाला गुरुवारी (ता. ५) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, गाद्या तसेच इतर दैनंदिन वापराच्या वस्तू आगीत खाक झाल्या. या वसतिगृहात सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच डहाणू अग्निशमन दलाच्या जवानांकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
दरम्यान, आग लागल्याची घटना वेळेत लक्षात आल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी कासा पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.