मुंबईला आसपासच्या शहरातूनही वायुप्रदूषणाचा धोका
उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईला शहरालगतच्या परिसरातूनही वायुप्रदूषणाचा धोका असल्याचे निरीक्षण गुरुवारी (ता. ५) उच्च न्यायालयाने नोंदवले आणि या गंभीर समस्येविषयी गठित दोन न्यायमूर्तींच्या उच्च स्तरीय समितीला उपाययोजना सुचविण्याचे आदेश सर्व पक्षकारांना दिले.
अटल सेतू ओलांडल्यानंतर पनवेल महापालिकेच्या हद्दीच्या भागांत मोठ्या प्रमाणात दगडखाणींचे काम सुरू असून सतत खडी वाहून नेली जाते. मोठमोठे कंटेनर उभे दिसतात. त्यामुळे या भागात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ते आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याकडे वनशक्ती या संस्थेच्या वतीने वरिष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी मुख्य न्या. श्री. चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि निवृत्त न्यायमूर्तींच्या उच्च समितीपुढे हा मुद्दा उपस्थित करण्याचीही मागणी द्वारकादास यांनी केली.
त्यावर दिल्लीतील वायुप्रदूषणाला हरियाना आणि पंजाबमधील वायुप्रदूषणाचाही फटक बसला असून त्यामुळेच दिल्लीची हवेची गुणवत्ता खालावली असल्याचे अभ्यासातून उघड झाले आहे. मुंबईतील वायुप्रदूषणाबाबतही हे असेच असू शकते. मुंबईतील वायुप्रदूषणाच्या समस्येला केवळ शहरातील बांधकामे किंवा अन्य स्रोत कारणीभूत नाहीत. तर मुंबईलगतच्या शहरांतील प्रदूषणही कारणीभूत असू शकते. त्यादृष्टीने अभ्यास करण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.