उल्हासनगरातील सोनोग्राफी सेंटरचा धक्कादायक वापर
बदलापूर, ता. ५ (बातमीदार)ः बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता उल्हासनगर येथील भगवान रुग्णालयात सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरचे धागेदोरे समोर आले आहेत. या प्रकरणात अटकेत असलेली सोनल गरेवाल ही अवघी बारावी शिक्षण घेतलेली तरुणी या सेंटरमध्ये मदतनीस म्हणून काम करीत होती. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, स्त्रीबीज विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या महिलांची सोनोग्राफी करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे काम ती करीत होती. हे फोटो आणि व्हिडिओ या तस्करीत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच कारणाने उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून हे सेंटर सील करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार सोनल ही तरुणी या सेंटरमध्ये डॉक्टर येण्यापूर्वीच करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
खासगी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी संबंधित सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्या चालक-मालकांचीदेखील पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सेंटरमध्ये असा अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती त्यांना होती का किंवा याबाबत इतकी हलगर्जी का दाखवण्यात आली, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील काहीजण संशयाच्या भोवऱ्यात येत असून, तपासाचे धागेदोरे आणखी विस्तृत होत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.