मुंबई

रंगारंग सोहळ्यात कला-संस्कृतीचा नजराणा

CD

रंगारंग सोहळ्यात कला-संस्कृतीचा नजराणा
दिलखेचक नृत्याविष्कार अन् लक्षवेधी सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध
मुंबई, ता. ५ ः प्रख्यात शाहीर गणेश चंदनशिवे आणि सहकाऱ्यांनी केलेले पारंपरिक सादरीकरण, ‘जयजयकार महाराष्ट्राचा... शूर शिवबाचा’ या दमदार पोवाड्याने निर्माण केलेला महाराष्ट्रभक्तीचा जोश, अभिनेत्री संस्कृती बालगुडेची ‘संभवामी युगे युगे...’ ही दमदार नृत्यनाटिका, अभिनेत्री पूजा सावंतच्या ‘अंग थरथरलंय नजरेनं...’ या गाण्यावरील नृत्याने मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षक, त्यानंतर अभिनेता पुष्कर जोगच्या ‘नजरेच्या जादूनं... काळीज चोरून...’ या दमदार नृत्याने कार्यक्रमात आणलेली रंगत आणि शेवटी गायक मोहम्मद अय्याज यांनी ‘दर्दे दिल, दर्दे जिगर...’ यांसारख्या गाण्यांनी सुरेल मैफल रंगवली. निमित्त होते, ‘सकाळ’च्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सकाळ सन्मान’ सोहळ्याचे. रंगारंग सोहळ्यात कलाकारांचा दिलखेचक नृत्याविष्कार आणि लक्षवेधी सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.
प्रभादेवी येथीर रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या ‘सकाळ सन्मान’ कार्यक्रमाची सुरुवात प्रख्यात शाहीर गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रभावी सादरीकरणाने झाली. चंदनशिवे यांनी ‘कलगीतुरा’ सादर करताना ‘शुभ मंगल चरणी गण नाचला..., नाचला कसा तरी पाहू चला...’ असा सवाल-जवाब रंगवला. त्यानंतर त्यांनी ‘नीतीमती पडली ची, पाणी आटले सारे...’ हे गीत सादर केले. याचदरम्यान शाहीर चंदनशिवे यांनी राष्ट्रपुरुषांना मानाचा मुजरा केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘जयकार महाराष्ट्राचा, शूर शंभूचा...’ हा पोवाडा सादर करत उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने ‘संभवामी युगे युगे...’ ही नृत्यनाटिका सादर केली. श्रीकृष्णाच्या वेशात कृष्ण थेट संवाद साधत असल्याचे प्रभावी चित्र उभे केले. यानंतर अभिनेत्री पूजा सावंतने ‘अंग थरथरले...’, ‘अवतरली सुंदरा... चंद्रा...’ या गीतांवरील नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. तसेच पुष्कर जोग आणि सहकाऱ्यांनी ‘नजरेच्या जादूनं... काळीज चोरून...’ यासह विविध गीतांवरील दमदार नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. याशिवाय गायक मोहम्मद अय्याज यांनी ‘दर्द-ए-दिल, दर्द-ए-जिगर...’ यांसारखी सदाबहार गीते सादर करून उपस्थितांना ताल धरायला लावले.
----
रितेशने सांगितली ‘सकाळ’ची आठवण
मनोरंजन क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेता रितेश देशमुखला ‘सकाळ सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी त्याने ‘सकाळ’सोबतची बालपणीची आठवण सांगितली. त्या वेळी घरात १७-१८ वर्तमानपत्रे यायची, तरीही ‘सकाळ’ आला का, असेच आपले वडील दिवंगत विलासराव देशमुख विचारायचे. ‘सकाळ’ने नवी पिढी घडवण्याचे काम केल्याचे त्याने नमूद केले. या वेळी रितेशने त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘राजा शिवाजी’ या आगामी चित्रपटाची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती एवढी मोठी आहे, की कोणीही त्यांच्यावर चित्रपट काढला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देऊ शकणार नाही, असेही त्याने प्रामाणिकपणे कबूल केले. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

SCROLL FOR NEXT