अर्थसंकल्पात मुंबईला काय?
- मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट
- अटल सेतू परिसरात ‘तिसरी मुंबई’, तर वाढवण परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याचे नियोजन
- मुंबई महानगरात नवे बेकायदा बांधकाम न होण्यासाठी जीआयएसआधारित ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’
- ‘वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया’पर्यंत ‘मेट्रो-११’ हा २३ हजार ४८७ कोटींचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प; पुढे धारावी पुनर्वसन प्रकल्पातून वांद्रे रेल्वे स्थानक व वांद्रे टर्मिनसपर्यंत नेण्याचे नियोजन
- २०२९ पर्यंत १६५ किमीची मेट्रो मार्गिका तयार करणार
- अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडण्यासाठी उन्नत मार्ग उभारणार
- दक्षिण मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत उन्नतमार्ग २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन; साकेत ते आमणे मार्गाचा प्रकल्प अहवाल लवकरच
- नवी मुंबईच्या एज्युसिटीतील सहा परदेशी विद्यापीठे याचवर्षी सुरू होणार