विक्रमगडमधील वीजसमस्येवर तोडगा
आलोंडेत महावितरणचे नवीन कार्यालय सुरू
विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)अंतर्गत कल्याण परिमंडळातील पालघर लघु मंडळाच्या पालघर विभागातील विक्रमगड उपविभागातील विद्यमान विक्रमगड शाखा कार्यालयाचे विभाजन करून नव्याने आलोंडे येथे शाखा कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील कार्यालयीन आदेश क्रमांक महावितरण कंपनीकडून जारी केले आहेत.
महावितरणच्या कर्मचारी सेवा विनियमांनुसार संचालक (वित्त), संचालक (संचालन), संचालक (वाणिज्य), संचालक (प्रकल्प) तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विक्रमगड शाखा कार्यालयाचे विभाजन करण्यात येणार असून नव्याने स्थापन होणाऱ्या आलोंडे शाखा कार्यालयासाठी स्वतंत्र प्रशासकीय, तांत्रिक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. विद्यमान विक्रमगड शाखा कार्यालयाच्या आस्थापनेवर विभाजनानंतर १२ खातेनिहाय पदे कायम ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नव्याने स्थापन होणाऱ्या आलोंडे शाखा कार्यालयाच्या आस्थापनेवर १२ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
------------------------
मंजूर पदे
१ सहाय्यक अभियंता
१ प्रधान तंत्रज्ञ
७ वरिष्ठ तंत्रज्ञ
१ तंत्रज्ञ
एकूण - १०
---------------------
निधीची तरतूद
आलोंडे शाखा कार्यालयाच्या पदनिर्मितीसाठी वार्षिक ८९,०१,५८८ रुपयांचा आर्थिक भार मंजूर केला आहे. तसेच प्रशासकीय खर्चासाठी १,०८,००० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महावितरणच्या निर्णयामुळे विक्रमगड परिसरातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.