मुंबई

कीटकनाशक फवारणीचे ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक

CD

कीटकनाशक फवारणीचे ड्रोनद्वारे प्रात्यक्षिक
विक्रमगड (बातमीदार) ः शेतकऱ्यांना कमी वेळेत, कमी खर्चात प्रभावीपणे कीटकनाशक फवारणी करता यावी, या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय व ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सावरई गावामध्ये ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सावरई येथील प्रगतिशील शेतकरी धाकल सातपुते यांच्या शेतातील मोगरा पिकावर ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. त्यासाठी लागणारी यंत्रणा, ड्रोनची कार्यपद्धती तसेच त्याचे फायद्यांबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक साहिल ठाकरे, हर्षद दुमाडा यांनी ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देत पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे सांगितले. या वेळी मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात औषधाची फवारणी, मजुरांवरील अवलंबित्व कमी होते, तसेच शेतकऱ्यांच्या आरोग्याचेही संरक्षण होत असल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

Lord Krishna Descendants : कोण आहेत श्रीकृष्णाचे वंशज? आता कुठे राहतात अन् कशी परिस्थिति आहे..पाहा

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT