बेकायदा फेरीवाल्यांना दणका
३५ टपऱ्या, २४ पत्राशेडवर पालिकेची कारवाई
विरार, ता. ७ (बातमीदार)ः वसई-विरार पालिका परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेने कारवाई सुरु केली आहे. याच अनुषंगाने प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत रेंज ऑफीसपासून फादरवाडी नाका परिसरातील ३५ टपऱ्या, २४ पत्राशेड, १५ बांबू शेड जमिनदोस्त करण्यात आली.
प्रभाग समिती ‘बी’ अंतर्गत प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील राधाकृष्ण हॉटेल परिसर, नागिनदास पाडा, मोरेगाव, मनवेलपाडा तलाव, कारगील नगर परिसरातील व मुख्य रस्त्यावरील बेकायदा स्टॉल, टपऱ्यांवर जेसीबीच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५२ टपऱ्या, १२ हातगाड्या, ८ शेड तोडण्यात आले. तर वसई पश्चिमेकडील वसई स्टेशन परिसर, आनंद नगर मार्केट परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले. या कारवाईत ८ टपऱ्या, ३ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.