मुंबई

समृद्धी महामार्गावर लुटारूंचा धुमाकूळ

CD

शहापूर, ता. ७ (वार्ताहर) : तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे विविध शहरांमध्ये दळणवळण सुलभ झाले आहे. मात्र आता या महामार्गावर लुटारूंच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील खुटघर गावाजवळील टोलनाका परिसरात ट्रकचालकाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि ट्रकमधील डिझेल चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकचालक जितेंद्रकुमार यादव हे नागपूर येथून औद्योगिक कारखान्यांमधील कोळशाची राख घेऊन भिवंडी तालुक्यातील पडघे गावाच्या दिशेने २ मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक करत होते. समृद्धी महामार्गावरील शहापूर तालुक्यातील खुटघर गावाच्या हद्दीत पोहोचले असता त्यांच्या धावत्या ट्रकमध्ये अचानक ८ ते १० जणांच्या टोळीने प्रवेश केला. हल्लेखोरांनी जितेंद्रकुमार यांना बेदम मारहाण करत ट्रक थांबवला. त्यानंतर ट्रकमधून खाली उतरवून लोखंडी सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवत जितेंद्रकुमार यांच्या खिशातील १२ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. तसेच ट्रकमधील १५० लिटर डिझेलही काढले. लूटमार केल्यानंतर ही टोळी घटनास्थळावरून पसार झाली.
घटनेनंतर जखमी अवस्थेत जितेंद्रकुमार यांनी आपल्या मालकाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. याप्रकरणी ट्रक व्यावसायिकाने तक्रार दाखल केल्यानंतर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस महामार्गावरील लुटारू टोळीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

T20 WC , IND vs NZ: न्यूझीलंडच्या कर्णधारानेही भारतीयांनाच दिली वॉर्निंग; २०२३ वर्ल्ड कपमध्ये फायनलला जे झालं, तसंच उद्या पण...

Iran-America War: ''ते चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते..'', अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं जहाज बुडाल्यानंतर भारताची प्रतिक्रिया

डोळ्यात आणि तोंडात तिखट टाकलं, अमानुष मारहाण अन्..., दत्तक घेतलेल्या मुलीसोबत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; संतापजनक कारण समोर

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

SCROLL FOR NEXT