आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
विक्रमगड (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथील शांतीरतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मालाड पूर्वेतील सेठ जुग्गीलाल पोद्दार अकादमी (आयसीएसई) शाळा तसेच ए.बी.व्ही.एम. अग्रवाल जटिया कोष ट्रस्टच्या सहकार्याने उपक्रम राबवण्यात आला. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी. त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विविध वस्तूंचे संकलन करून पोहोचविण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांना कपडे, स्टेशनरी साहित्य, नोटबुक, शालेय दप्तर, खेळणी तसेच विविध खेळांचे साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर दैनंदिन वापरासाठी लागणारे किराणा साहित्याचेही वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.