बोईसर, ता. ७ (वार्ताहर): पास्थळ येथील मातृछाया अपार्टमेंटमधील काही इमारतींमध्ये पाण्याअभावी रहिवाशांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मुलांच्या परीक्षांच्या हंगामातच पाणीटंचाई उद्भवली असून विकासकाने वेठीस धरल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
आयुष्यभराची कमाई खर्च करून घर घेतले. घराचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रहिवाशांचे जीवन त्रस्त झाले आहे. विशेषतः पाण्याच्या टंचाईमुळे महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा आहे. रहिवाशांच्या आरोपानुसार, विकासकाने प्रकल्पाच्या जाहिरातींमध्ये २४ तास वीज, पाण्याची सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात आश्वासनांना हरताळ फासल्याचे चित्र आहे. इमारतीचे वीजबिल विकासकाने भरले नसल्यावे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती सदनिका धारकाकडून समोर आली आहे. परिणामी, बोरिंगची मोटार बंद पडली असून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत झाल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित बिल्डर पवन सिंग यांच्याशी संपर्क झाला नसल्याने अधिकृत भूमिका समजू शकलेली नाही.
-------------------------
विकासकाने रहिवाशांच्या मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात. पाणी, वीजसारख्या आवश्यक सुविधांबाबत नागरिकांना त्रास होत असेल तर सहन केले जाणार नाही. प्रश्न मार्गी लावला गेला नाहीतर शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल.
- अतुल देसाई, शहरप्रमुख, शिवसेना, बोईसर
------------------------
सदनिका घेताना विविध सुविधांची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत त्यापैकी एकही सुविधा मिळालेली नाही. पाणी, वीज अशा मूलभूत गरजांसाठीही आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे.
-दुर्गेश मोरे, सदनिकाधारक
----------------
तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद असल्याने बोरिंगची मोटार बंद पडली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवासी त्रस्त आहेत.
- रंजन सिंग, सदनिकाधारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.