आदिवासी संस्कृतीची शिमगोत्सवावर छाप
होळीपासून रंगपंचमीपर्यंत ‘पोस्त’ मागण्याची परंपरा
मोखाडा, ता. ७ ः आदिवासी भागात साजरा होणारा होळी अर्थात शिमगा हा केवळ रंगांचा सण नसून सांस्कृतिक ऐक्य, परंपरा आणि सामूहिकतेचा एक उत्सव आहे. याच शिमगोत्सवात ‘पोस्त’ मागण्याची अनोखी, पारंपरिक प्रथा होळीपासून रंगपंचमीपर्यंत उत्साहात जपली जात आहे.
मोखाडा तालुक्यातील विविध आदिवासी पाड्यांमध्ये शिमगोत्सवाच्या निमित्ताने शाळकरी मुले, तरुण मंडळी आणि ग्रामस्थ रस्त्यावर येऊन ‘पोस्त’ मागण्याचा उपक्रम राबवतात. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना नम्रपणे थांबवून सणासाठी स्वेच्छेने देणगी मागितली जाते. ही देणगी पूर्णपणे ऐच्छिक असून कुठल्याही प्रकारचा बळजबरीचा प्रश्न नसतो. शिमगोत्सवाच्या काळात तरुण मंडळी ढोल-ताशांच्या गजरात गावभर फेरी काढतात. चेहऱ्यावर आकर्षक रंगरंगोटी, विविध पारंपरिक मुखवटे, सोंगे आणि वेशभूषा करून बाजारपेठ घराघरांत जातात. पोस्त मागताना पारंपरिक गीते गायली जातात आणि नृत्य सादर केले जाते. या सगळ्या वातावरणामुळे गावात उत्साह, आनंदाचे वातावरण निर्माण होते.
---------------------------------------------------------------
नव्या पिढीचा सहभाग
-‘पोस्त’ म्हणजे शिमगोत्सवासाठी ग्रामस्थांकडून स्वेच्छेने दिली जाणारी देणगी. यात तांदूळ, भात, नाचणी, गूळ, नारळ तसेच काही ठिकाणी रोख रक्कम दिली जाते. जमा झालेली ही रक्कम व धान्य गावातील सामूहिक पूजा, होळी दहन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामूहिक भोजनासाठी वापरले जाते.
- शहरीकरण, बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवरही आदिवासी भागात शिमगोत्सवातील पोस्त मागण्याची परंपरा तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. नव्या पिढीचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो. त्यामुळे आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जोपासला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.