मुंबई

ठाणे रेल्वे स्थानकावर तरुणाचा मोबाईल चोरीला

CD

परीक्षेसाठी आलेल्या पुण्यातील तरुणाचा मोबाईल चोरीला
सकाळ वृतसेवा
ठाणे, ता. ७ : मुंबईत परीक्षा देण्यासाठी आलेल्या पुण्यातील एका तरुणाचा मोबाईल फोन ठाणे रेल्वे स्थानकावर चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील गुरूवार पेठ येथे राहणारा ओंकार युवराज देवकर (वय २८) हा तरुण एमपीएससीची तयारी करत आहे. ५ मार्च रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची परीक्षा देण्यासाठी तो मुंबईतील पवई येथे आला होता. परीक्षा संपल्यानंतर तो पुन्हा पुण्याकडे जाण्यासाठी रात्री सुमारे ८.५२ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर आला.
त्यावेळी हुबळी एक्सप्रेस गाडीत मोठी गर्दी होती. त्यामुळे तो मोटरमनच्या बाजूच्या दुसऱ्या जनरल डब्यात चढत असताना त्यांच्या पँटच्या उजव्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने चोरून नेला. चोरीला गेलेल्या मोबाईल फोनची किंमत सुमारे १८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Crematorium Closed : पुण्यातील स्मशानभूमीला इराण- इस्रायल युद्धाच्या झळा; गॅस दाहिन्या बंद, अंत्यसंस्कार वेटिंगवर

T20 World Cup: हार्दिक पांड्याने सांगितला भविष्यातील प्लॅन! म्हणाला, तीन ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत, आता...

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

Pune News: इराणच्या बंदरांवर कंटेनर अडकले! कृषिमाल निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम; इराणी सफरचंद, किवीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका..

'तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत दारु प्यायची का?' उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...'तुम्हाला काय करायचं?'

SCROLL FOR NEXT