मुंबई

आजीबाईंच्या शाळेत १०० आजीबाई गिरवणार साक्षरतेचे धडे

CD

आजीबाईंच्या शाळेत १०० आजीबाई गिरवणार साक्षरतेचे धडे
मुरबाड, ता. ७ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील फागणे येथील आजीबाईंच्या शाळेत शनिवारी (ता. ७) जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त परिसरातील विविध गावांतील १०० हून अधिक आजीबाईंनी एकत्र येत साक्षरतेचे धडे गिरवले.
जागतिक महिला दिनाचा मुहूर्त साधून ८ मार्च २०१६ रोजी मुरबाड तालुक्यातील फागणे येथे आजीबाईंच्या शाळेचे उद्‍घाटन इंदुमती दलाल यांच्या हस्ते करण्यात आले होते. साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आजीबाई या शाळेत विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या. या उपक्रमाला सर्वात प्रथम ‘सकाळ’ने प्रसिद्धी दिली व त्यानंतर या शाळेचा महिमा जगभरात पोहोचला. यंदा आजीबाईंच्या शाळेचा अकरावा वर्धापन दिन असून यानिमित्त विविध कार्यक्रम राबवून साजरा केला आहे. याप्रसंगी आजीबाईंच्या शाळेचा प्रवास छायाचित्र रूपाने मांडला गेला. त्यासाठी मोतीराम दलाल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप दलाल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आजीबाईंना विमानातून अयोध्या वारी घडविणारे सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश लोकरे, उद्योजक विजय पनवेलकर, संध्या पर्वच्या संस्थापिका प्रिया जाधव, उद्योजक दिलीप चौधरी, अविनाश पाटील, दिलीप दलाल, आजीबाईंच्या शाळेचे संस्थापक योगेंद्र बांगर, शिक्षिका शितल प्रकाश मोरे उपस्थित होते.

आयुष्यात प्रथमच स्वाक्षरीचा आनंद
उमंग फाउंडेशनच्या वतीने अशिष गोयल यांच्या माध्यमातून तब्बल १३० आजीबाईंना गणवेश, दप्तर, वही, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, उमंग फाउंडेशनच्या मदतीने या आजीबाईंनी स्वतःची सही करायला शिकून आयुष्यात प्रथमच स्वाक्षरी करण्याचा आनंद लुटला. आजीबाईंना साक्षरतेचा मार्ग दाखविणाऱ्या या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ महिलांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

फोटो ओळी
मुरबाड ः तालुक्यातील फांगणे गावातील आजीबाईंच्या शाळेतील विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT