मुंबई

महिला शक्तीचा गौरव करणारा दिवस - महापौर अश्विनी निकम

CD

महिला शक्तीचा गौरव करणारा दिवस ः महापौर अश्विनी निकम
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : उल्हासनगर शहराच्या महापौरपदी एका महिलेला संधी मिळणे ही केवळ सन्मानाची बाब नसून संपूर्ण महिला शक्तीच्या कर्तृत्वाची ओळख आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर अश्विनी निकम यांनी शहरातील महिलांच्या आरोग्य, सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. यंदाचा महिला दिन सामाजिक जागरूकता आणि महिला सन्मानाचा संदेश देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एका महिला म्हणून हा बहुमान अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना अश्विनी निकम यांनी व्यक्त केली. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून उल्हासनगर शहरातील प्रत्येक महिला, माता आणि भगिनींच्या सामर्थ्याचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महिला दिनानिमित्त उल्हासनगरमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गर्भाशयमुख कर्करोगापासून मुलींचे संरक्षण करण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती आणि सुरक्षिततेचा दृढ संकल्प, महिलांची आरोग्य तपासणी शिबिर, महिलांसाठी प्रशिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. महिला दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून महिलांच्या सन्मान, आरोग्य आणि सक्षमीकरणाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस असल्याचे सांगत शहरातील सर्व महिलांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन अश्विनी निकम यांनी केले.

व्यासपीठ उपलब्ध करणार
महापौरपद ही केवळ प्रतिष्ठेची नव्हे तर मोठी जबाबदारी असल्याचे नमूद करत शहराच्या सर्वांगीण विकासासोबत महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. विशेषतः महिलांच्या आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी विविध प्रकल्प आणि उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांना आरोग्यविषयक सुविधा, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात पुढे येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT