मुंबई

पन्नास हजार डोळ्यांची शस्त्रक्रिया करणारी देवदूत

CD

५० हजार डोळ्यांची शस्त्रक्रिया करणारी देवदूत
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ७ ः आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. युद्धापासून सामाजिक कार्यापर्यंत त्यांची यशस्वी कामगिरी दिसत आहे. आता तिच्या हातात केवळ पाळण्याचीच दोरी नसून देशाच्या विकासाची किल्लीदेखील आहे. मोठमोठी आव्हाने पेलत ती वैद्यकीय क्षेत्रात तिचे कसब दाखवत आहे. त्यापैकी एक असलेल्या नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर या विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब रुग्णांच्या डोळ्यांवर जोखमीची शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्याचे काम करीत आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या डॉ. शुभांगी यांनी आतापर्यंत ५० हजारांहून अधिक जणांची दृष्टी वाचवली आहे.
ग्रामीण भागात जन्माला आलेल्या शुभांगी या सध्या ठाणे जिल्ह्यातील विठ्ठल सायना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेतृत्व म्हणून काम करीत आहेत. मानवावरील अवघड शस्त्रक्रियांपैकी एक डोळ्यांवरील महत्त्वाच्या शस्त्रक्रियेत त्या पारंगत आहेत. या क्षेत्रात विविध अत्याधुनिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पारंगता प्राप्त केली आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील रुग्णाच्या डोळ्यावरील गंभीर शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरीत्या केलेल्या आहेत.
ठाणे जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. दुर्गम गावपाड्यातून गरीब उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात येतात. दुर्गम भागातील गरीब रुग्णांमध्ये आरोग्याबाबत तशी जागृती नसल्याने त्यांचे मोतीबिंदूसारख्या सामान्य व्याधीकडे दुर्लक्ष होते. परिणामी व्याधी वाढल्याने दृष्टी जाण्याची परिस्थिती निर्माण होते. अशा अवस्थेत रुग्ण जिल्हा रुग्णालयात आल्यावर डॉ. शुभांगी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांची दृष्टी वाचवण्यात अग्रेसर असतात. रुग्णांची आपुलकीने काळजी घेत त्यांनी रुग्णांमध्ये कौटुंबिक जागा निर्माण केली आहे. त्यामुळे अनेकांना डोळ्याची शस्त्रक्रिया त्यांच्या हातून व्हावी, अशी अपेक्षा असते. दिवसभरात सलग अनेक शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

रुग्णांसाठी आशेचा किरण
अलीकडेच त्यांनी मुरबाडमधील पाच वर्षांची राणी आणि आंबिवलीतील १० वर्षांच्या विजय नामक मुलाला लहान वयातच झालेल्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना जग पाहण्याची संधी निर्माण करून दिली. भिवंडीतील ४५ वर्षीय ताहीर अन्सारी नामक मूकबधिर आणि ७९ वर्षीय अजीज शेख नामक रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून वैद्यकीय क्षेत्रात कमाल करून दाखवली आहे. म्हणूनच गरिबांवर उपचार करणाऱ्या डॉ. शुभांगी यांना गरीब रुग्ण डॉक्टर नव्हे, तर डोळ्यांचा देवदूत म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT