उल्हासनगरमध्ये बचत गटांच्या महिलांना स्व-रोजगाराची संधी
प्रलंबित स्टॉलवाटपाचा मार्ग मोकळा
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : उल्हासनगर शहरातील महिला बचत गटांसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन यंदा खऱ्या अर्थाने सन्मानाचा आणि स्वावलंबनाचा ठरणार आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्टॉलवाटपाच्या प्रश्नाला अखेर सकारात्मक मार्ग मिळाला असून, शहरातील महिलांना स्व-रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
उल्हासनगरमध्ये महिला बचत गटांना स्टॉलवाटपाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून रखडला होता. या प्रश्नासाठी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. या संघर्षाला अखेर यश मिळाले असून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या मध्यस्थीने महिला बचत गटांना स्टॉलवाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता गटनेते अरुण आशान यांच्या सहकार्याने शिवाजी रगडे यांच्या पुढाकाराने पूर्ण करण्यात आली.
स्वावलंबनाला नवी चालना
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातील महिला बचत गटांच्या महिलांना स्व-रोजगारासाठी स्टॉलवाटप करून सन्मानित करण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त मनीषा आव्हाळे, महापौर अश्विनी निकम आणि शिवसेना गटनेते अरुण आशान यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा विशेष कार्यक्रम ८ मार्चला पार पडणार आहे. यामुळे महिला बचत गटांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आंतरराष्ट्रीय महिला दिनी मिळणाऱ्या या संधीमुळे महिलांच्या स्वावलंबनाला नवी चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.