दिव्यात सीलबंद पाण्याच्या जारमध्ये आढळला साप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : पिण्यासाठी विकत आणलेल्या २० लिटरच्या सीलबंद पाण्याच्या जारमध्ये साप आढळून आल्याची धक्कादायक घटना दिव्यातील साबेगाव परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे दिवा परिसरात एकच खळबळ उडाली असून पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दिवा परिसरात वर्षभर पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने अनेक नागरिकांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. त्यानुसार साबेगाव येथील एका कुटुंबाने घरगुती वापरासाठी २० लिटरचा सीलबंद पाण्याचा जार विकत घेतला होता. जार पारदर्शक असल्यामुळे वापरण्यापूर्वी त्याची पाहणी करत असताना त्यामध्ये साप असल्याचे संबंधित कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे.
सीलबंद जारमध्ये साप कसा गेला आणि त्यामध्ये साप दिसत असतानाही त्या जारची विक्री कशी झाली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच अन्न व औषध प्रशासनाने दिवा आणि परिसरातील पाणी शुद्धीकरण केंद्रांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.