मुंबई

सात दिवसांत ४.२२ कोटींची पाणीपट्टी वसुली

CD

सात दिवसांत ४.२२ कोटींची पाणीपट्टी वसुली
ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र

ठाणे, ता. ७ ः ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित पाणीपट्टी वसुली होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे कठीण जात आहे. त्यामुळे यंदा महापालिका आयुक्तांनी विशेष बैठक घेऊन पाणीपट्टी वसुलीवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम तीव्र केली असून मागील सात दिवसांत तब्बल चार कोटी २२ लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
महापालिकेकडून दरवर्षी पाणीपुरवठा विभागाला ठरावीक उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते; मात्र हे उद्दिष्ट पूर्ण करताना विभागाची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाणीपुरवठा विभागाला २२५ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र १३६ कोटी रुपयांचीच वसुली होऊ शकली. त्यामुळे यंदाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवून वसुली मोहीम अधिक आक्रमकपणे राबविण्यात येत आहे.
थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेने नळजोडण्या खंडित करणे, नोटिसा बजावणे तसेच पंप जप्त करणे, अशा कारवाया सुरू केल्या आहेत. त्यानुसार मानपाडा प्रभागातून एक कोटी १४ लाख ६५ हजार रुपयांची वसुली झाली आहे. कळवा प्रभागातून ५९ लाख रुपयांची वसुली करत ५३ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. नौपाडा प्रभागातून ५२ लाख ९८ हजार रुपयांची वसुली झाली असून ३१ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. वर्तकनगर प्रभागातून ४९ लाख ९४ हजार रुपयांची वसुली करत २० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
उथळसर प्रभागातून ३६ लाख ६१ हजार, लोकमान्य- सावरकरनगर प्रभागातून ३१ लाख ३७ हजार, वागळे प्रभागातून २५ लाख १३ हजार तर दिवा प्रभागातून २३ लाख ६४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. दिवा प्रभागात १८ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून तीन पंप जप्त आणि एक पंपरूम सील करण्यात आली आहे. मुंब्रा प्रभागातून १६ लाख ६० हजार तर नागरी सुविधा केंद्रांतून १२ लाख ३२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले, की पाणीपट्टी थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार आहे. नागरिकांनी थकीत देयके तातडीने भरून कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

थकबाकीदारांवर कारवाई तीव्र
पाणीपट्टी थकविणाऱ्या नागरिकांविरोधात नळजोडण्या खंडित करणे, पंप जप्त करणे आणि नोटिसा बजावणे, अशा कठोर कारवाया महापालिकेकडून सुरू असून वसुली मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT