मुंबई

महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

CD

महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे दिसून आले.
या आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, कान-नाक-घसा तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली. खारघर, नवी मुंबई येथील मेडिकल हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांसह सुमारे १० जणांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची सविस्तर तपासणी केली. तपासणीदरम्यान नागरिकांना आवश्यक ते आरोग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
या शिबिरात सुमारे १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती डॉ. मृणाल आमले यांनी दिली. तपासणीनंतर डॉक्टरांनी नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक रामदास शेवाळे तसेच नगरसेविका सायली सरक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रामदास शेवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिला दिनानिमित्त महिलांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे परिसरातील अनेक महिलांना व नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला असून कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

DigiMHADA App : म्हाडा झालं डिजिटल! कुठेही जायची गरज नाही, 'या' सेवा मिळतील एकाच अ‍ॅपवर

Dhanashree Ahire : शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली आयपीएस; धनश्री अहिरेची प्रेरणादायी यशोगाथा

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

SCROLL FOR NEXT