मुंबई

तळोजा फेज-१ मध्ये शिवजयंती उत्साहात

CD

तळोजा फेज-१मध्ये शिवजयंती उत्साहात
सामाजिक उपक्रमांसह शिवभजन संध्या
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : तळोजा शहर फेज-१ येथील तळोजा शहर पोलिस चौकीच्या मुख्य चौकात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती ६ मार्चला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शिवप्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी शिवगर्जना करीत परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमात तरुण, लहान मुले आणि मुलींच्या माध्यमातून शिवकालीन युद्धकला, लाठीकाठीचे सादरीकरण करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदाब तपासणी तसेच विविध ओळखपत्र नोंदणी शिबिराचा समावेश होता. या उपक्रमांमध्ये तळोजा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होत सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस यंत्रणा, पनवेल महापालिका तसेच स्थानिक व्यापारी व शिवभक्तांनी मोलाचे सहकार्य केले. संध्याकाळी आयोजित शिवभजन संध्येत वारकरी संप्रदायातील मंडळींनी भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. या कार्यक्रमासाठी स्थानिक शिवभक्तांनी मोठे परिश्रम घेतले असून, अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT