मुंबई

महिला दिनानिमित्त धारावीतील दीड हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

CD

महिला दिनानिमित्त धारावीतील
दीड हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
आरोग्याबाबत जनजागृती; एनएमडीपीएलचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर धारावीतील विविध शाळांमधील तब्बल १,५०० मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. तसेच आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे मुलींमध्ये प्रसंगावधानता आणि आत्मविश्वास निर्माण होणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवणाऱ्या एनएमडीपीएलच्या माध्यमातून हे धडे देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या डीआरपी आणि अदाणी ग्रुपच्या एनएमडीपीएकडून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. पुनर्विकास प्रकल्प राबवतानाच एमएमडीपीएलकडून बेरोजगार तरुणांना कौशल्य विकासाचे धडे, मैदानी खेळाचे प्रशिक्षण असे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्यापुढे जात आता महिलांना आणि शाळेतील मुलींना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत सात शाळांमधील १,५०० हून अधिक मुलींनी या उपक्रमात सहभागी करून घेत स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. स्वसंरक्षण कार्यशाळांचे नेतृत्व मार्शल आर्ट्स प्रशिक्षक डॉ. चीता यज्ञेश शेट्टी करत असून, असुरक्षित परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत तंत्रांचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना दिले जात आहे. या सत्रांमध्ये परिस्थितीची जाणीव, त्वरित निर्णयक्षमता आणि साध्या स्वसंरक्षण तंत्रांवर विशेष भर देण्यात येत असल्याचे एनएमडीपीएलने स्पष्ट केले आहे.

‘गुड टच बॅड टच’बाबत कार्यशाळा
स्वसंरक्षण प्रशिक्षणासोबतच फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीएआय) यांच्या माध्यमातून मासिक पाळी स्वच्छता, पौगंडावस्था, तसेच ‘गुड टच बॅड टच’ याबाबत संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत. या सत्रांद्वारे प्रजनन आरोग्याबाबत खुल्या संवादाला प्रोत्साहन देणे आणि अनुचित वर्तन ओळखून त्याची तक्रार कशी करावी, याबाबत मुलींना मार्गदर्शन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

Lord Krishna Descendants : कोण आहेत श्रीकृष्णाचे वंशज? आता कुठे राहतात अन् कशी परिस्थिति आहे..पाहा

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT