मुंबई

आज ‘ती’चा उत्सव

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : बदलत्या काळासोबत महिलांची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात विस्तारत आहे. ठाणेकर महिलाही याला अपवाद नाहीत. प्रशासन, उद्योग, क्रीडा, सामाजिक कार्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत ठाणेकर महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले असून, शहराच्या विकासात त्या ताकदीने आपले योगदान देत आहेत. म्हणूनच उद्या रविवारी (ता. ८) साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. या वेळी स्त्री-कर्तृत्वाचा गौरव आणि सक्षमीकरणाचा जागर होणार आहे.

ठाणे शहरासह जिल्हा विकासाच्या दिशने झेपावत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिला आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. घर, नोकरी, उद्योग, करिअर आणि छंद जोपासताना तिची तारेवरची कसरत होत असली तरी रोज नव्या दमाने ती त्याच ऊर्जेने आपले कर्तव्य बजावत आहे. म्हणूनच खास ‘ती’च्यासाठी उद्या (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या संकल्पनेनुसार महिला व बालविकास विभागामार्फत यावर्षी ‘लाडक्या बहिणींच्या आरोग्याची काळजी’ हे ब्रीद घेऊन विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची रेलचेल
महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा होणार आहेत. शनिवारी (ता. ७) पालिका कर्मचाऱ्यांनी काढलेल्या रांगोळीने मुख्यालय सजले होते. याशिवाय अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन पालिकेने महिलांसाठी केले आहे. शहरातील मॉलपासून ते छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये अनेक ठिकाणी महिलांना कपड्यांपासून ते सौंदर्यप्रसाधनासह १५ ते ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी व्याख्याने, गौरव, सत्कार अशा कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

पान ३ वर
स्त्री सक्षमीकरणाचा संकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

Dhanashree Ahire : शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली आयपीएस; धनश्री अहिरेची प्रेरणादायी यशोगाथा

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

SCROLL FOR NEXT