स्त्री सक्षमीकरणाचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ या उक्तीचा प्रत्यय आज खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यात येत आहे. यंदाचा जागतिक महिला दिन ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर या महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांची धुरा आज महिला महापौर, नगराध्यक्षांच्या सक्षम खांद्यावर आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या महिलांची संख्याही पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढली आहे. हे केवळ आरक्षणापुरते मर्यादित नसून प्रशासकीय आणि राजकीय निर्णयप्रक्रियेत महिलांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. याला साथ प्रशासकीय सेवेत असलेल्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिळत आहे. म्हणूनच यंदाचा हा महिला दिन खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यात स्त्री शक्तीचा जागर करणारा ठरणार आहे, म्हणूनच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढची वाटचाल कशी असेल, याविषयी आढावा घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.