मुंबई

महिला दिनानिमित्त मेट्रोची कमान महिलांवर

CD

मेट्रोची कमान महिलांवर
- मेट्रो-३च्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरोळ स्थानकाचे संचालन करणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी (ता. ८) मेट्रो-३ मार्गावरील दोन स्थानकांची संपूर्ण कमान महिलांवर असणार आहे. मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन्ही स्थानकांचे संपूर्ण संचालन महिलांकडून केले जाणार आहे. शहरी वाहतूक क्षेत्रामध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी एमएमआरसीएने हा उपक्रम हाती घेतला आहे.
आरे-कफ परेड या भुयारी मेट्रो मार्गावरील स्थानकांवरील दैनंदिन कामकाजामध्ये स्थानक नियंत्रण, तिकिटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा व्यवस्था, देखभाल सहाय्य आणि हाऊसकीपिंग अशा विविध जबाबदाऱ्या कर्मऱ्यांकडून पार पाडल्या जातात. दरम्यान, रविवारी महिला दिनानिमित्त येथील मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांतील सर्व कामे महिलांकडून केली जाणार आहेत. त्यासाठी दिवसभरातील वेगवगेळ्या शिफ्टमध्ये मिळून एकूण ८५ महिला कर्मचारी या स्थानकांचे कामकाज सांभाळतील.

२७ महिला मेट्रो पायलट
भुयारी मेट्रो मार्गाच्या संचालनामध्ये २७ महिला ट्रेन ऑपरेटर्स (मेट्रो पायलट) महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्या नियमितपणे मेट्रो गाड्यांचे संचालन करीत आहेत. एकूणच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये १,३८८ महिला कर्मचारी विविध स्तरांवर कार्यरत आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचारी तसेच ऑपरेशन्स, तिकिटिंग, हाऊसकीपिंग आणि सुरक्षा सेवांमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News: स्कूटीवरून दोन तरूण आले, कारवर पेट्रोल टाकून आग लावली अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Jalgaon News : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्र

Accident: मालगाडीचा मोठा अपघात! रुळ उखडले अन् चाकेही वेगळी झाली; रेल्वेचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

SCROLL FOR NEXT