मुंबई

नवी मुंबईत घुमणार आगरी-कोळी संस्कृतीचे स्वर

CD

नवी मुंबईत घुमणार आगरी-कोळी संस्कृतीचे स्वर
तुर्भे, ता.७ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत आगरी-कोळी संस्कृतीचा वारसा जपणारा अनोखा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. स्व. डी. आर. पाटील आणि स्व. भोलानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ “आगरी कोळी संस्कृतीचा सन्मान धवलारणींचा” या संकल्पनेखाली पारंपारिक धवल गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक व माथाडी नेते चंद्रकांत पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आगरी-कोळी समाजातील पारंपरिक ‘धवल गीत’ हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
ही स्पर्धा रविवार, ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता तुर्भेगाव येथील डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालयात होणार आहे. स्पर्धेचे परीक्षण चंद्रकला दासरी, नवनाथ ठाकूर आणि अवनी पाटील हे करणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजिता पाटील करतील. नगरसेविका कविता पाटील यांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. नाव नोंदणीसाठी संगिता पाटील व कविता पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

DigiMHADA App : म्हाडा झालं डिजिटल! कुठेही जायची गरज नाही, 'या' सेवा मिळतील एकाच अ‍ॅपवर

Dhanashree Ahire : शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली आयपीएस; धनश्री अहिरेची प्रेरणादायी यशोगाथा

SCROLL FOR NEXT