मुंबई

रेल्वेच्या कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

CD

रेल्वेच्या कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या हल्ल्यामागे कल्याणमधील कुख्यात प्रशांत देशमुख ऊर्फ पीडी याचा हात असल्याचे समोर आले आहे. बाजारपेठ पोलिसांनी कंत्राटदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. प्रशांत देशमुखने गेल्या काही वर्षांत अनेकांवर हल्ले केल्याची माहितीही समोर येत आहे.

कल्याणमध्ये राहणारे विशाल नायडू हे रेल्वे कंत्राटदार आहेत. होळीच्या दिवशी त्यांच्या मित्राने त्यांना प्रशांत देशमुखशी बोलण्यास सांगितले. विशाल आणि प्रशांत यांची ओळख असली, तरी चार वर्षांपूर्वी विशालच्या मित्रावर झालेल्या हल्ल्यात प्रशांतचे नाव आल्याने विशालने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्या दिवशी अनिकेत माने नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून प्रशांतचा फोन आला आणि त्याने विशालला फोन करण्यास सांगितले. विशालने फोन केल्यावर प्रशांतने शिवीगाळ करत धमकी दिली. काही वेळानंतर आधारवाडी सर्कलजवळ प्रतीक ठाकरे, शुभम नाडे, सुजय कदम आणि अक्षय तेली यांच्यासह काही जणांनी विशालवर चाकूचा धाक दाखवत हल्ला केला. जखमी विशालवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT