मुंबई

मुंब्र्यात पहाटे गोळीबाराचा थरार ..!

CD

बांधकाम व्यावसायिकाच्या
घराबाहेर हवेत गोळीबार
मुंब्र्यात पोलिस पथकावरही झाडल्या गोळ्या

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : मुंब्रा परिसरातील बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर हवेत आणि चारचाकी गाडीवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरही फिल्मीस्टाइल गोळीबार केल्याची घटना शनिवारी (ता. ७) पहाटे घडली. या घटनेत दोघे जखमी झाले आहेत. आरोपी शहाबाद ऊर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी (वय २८) याला मुंब्रा पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे व चार मॅगझीन जप्त केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.
कौसा येथील अरमान गृहनिर्माण सोसायटी येथे बांधकाम व्यावसायिक तथा यूट्युबर नदीम मोइनुद्दीन खान ऊर्फ बाबा खान (४५) यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस सावंत यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या कारवर दोन, तर हवेत एक गोळी झाडण्यात आली होती. घटनेनंतर आरोपी कुरेशी हा आचारगल्ली येथे गेल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तिकडे धाव घेतली. भंगार गोडाऊनमध्ये लपलेल्या कुरेशीला बाहेर येण्यास आवाज दिला असता, त्याने बाहेर येत पोलिस पथकावर दोन्ही हातात पिस्तूल घेऊन फिल्मीस्टाइल गोळीबार केला. सावंत यांनी त्यास गोळीबार न करण्यास सांगितले; मात्र पोलिसांना न जुमानता त्याने गोळीबार सुरूच ठेवला. त्याने झाडलेली एक गोळी जमावातील एका नागरिकाच्या पोटात, तर एकाच्या हाताला लागली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने ढकलून खाली पाडले. तरीही गोळी झाडण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी ती खेचून काढल्याने पुढील अनर्थ टळला.
----
गोळीबाराचे कारण अस्पष्ट
दरम्यान, संतप्त जमावाने लाकडी बांबू व लोखंडी रॉडने कुरेशीला मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याची सुटका करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि चार मॅगझीन जप्त केले. याप्रकरणी कुरेशी आणि त्याच्या फरार साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे; परंतु या गोळीबाराचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
---
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात
या घटनेनंतर बांधकाम व्यावसायिक नदीम खान यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गोळीबार करणारा कुरेशी हा आठ वर्षे तिहार कारागृहात होता. तसेच दिल्लीतील जाफराबाद येथील चार पोलिस ठाण्यांत वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Live Update: मार्ग खुला झाल्यानंतर कतार भारताला एलएनजी पुरवठा सुरू करेल: सरकारी सूत्र

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT