मुंबई

इराण-इस्त्राईल युद्धाची झळ नवी मुंबईतील हॉटेल्सना; गॅस वितरणावरील बंदीमुळे व्यावसायिक संकटात

CD

गॅस वितरणावरील बंदीमुळे
व्यावसायिक संकटात

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्त्राईल संघर्षाचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. याचा फटका नवी मुंबईतील हॉटेल आणि खाणावळ व्यावसायिकांनाही बसत आहे. व्यावसायिक गॅस वितरणावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे शहरातील खाद्य सेवा उद्योग कोलमडण्याच्या स्थितीत असून, यावर राज्य सरकारने तातडीने मध्यम मार्ग काढावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबई प्रवक्ते सचिन कटारे यांनी केली आहे.
नवी मुंबई हे रोजगाराचे मोठे केंद्र असल्याने येथे राज्यभरातून हजारो तरुण, कामगार आणि विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यातील बहुतांश वर्ग हा दैनंदिन जेवणासाठी स्थानिक हॉटेल आणि खाणावळींवर अवलंबून आहे. मात्र इराण-इस्त्राईल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मर्यादा आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गॅस वितरणावरील निर्बंधांमुळे हॉटेलचालकांना आवश्यक इंधन मिळेनासे झाल्याने अनेक व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अन्नपदार्थांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली, तर सर्वसामान्य नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून त्यांच्या जेवणाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबईचे प्रवक्ते सचिन कटारे यांनी यासंदर्भात राज्य शासनाला ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. तसेच हा केवळ हॉटेल व्यावसायिकांचा प्रश्न नसून, शहरात राहणाऱ्या हजारो कष्टकरी आणि विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. शासनाने व्यावसायिक गॅस वितरणाबाबत लवचिक आणि संतुलित धोरण राबवून यावर तत्काळ तोडगा काढावा. तसेच शहरातील सेवा क्षेत्र टिकवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

Latest Marathi News Live Update: सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

या मूलांकाच्या लोकांपासून सावध राहा ! अंतर्ज्ञानी असतात हे लोक; भविष्यातील घटना आधीच समजतात

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT